रामपुर्यातील प्रेमी युगुलाची आत्महत्या

शिरपूर : तालुक्यातील वरझडी गावाजवळील रामपूर्यातील प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. निलेश शांतीलाल पावरा (25) व शर्मिला सुरसिंग पावरा (19) अशी मयतांची नावे आहेत. निलेश विवाहित असल्यामुळे त्यांच्या प्रेमप्रकरणाला घरातून विरोध होत होता़ त्यामुळे त्याने शर्मिला हिला घेवून दुपारच्या सुमारास गावातून पळ काढला़ त्या दोघांनी गावापासून 4-5 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाडी गावाच्या शिवारात असलेल्या मगन ईशा पावरा यांच्या शेतातील बांधावर असलेल्या एका पळसाच्या झाडाला दोर बांधून दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. 1 जानेवारी रोजी दोघांचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचावर अंत्यसंस्कार करण्यात आले़


