जळगावच्या दाम्पत्यास भुसावळात मारहाण : महिलेचा केला विनयभंग, त्रिकूटाविरोधात गुन्हा
Jalgaon couple beaten up in Bhusawal : The woman was molested, a crime against the trio भुसावळ : उधारीचे पैसे मागण्यासाठी शहरात आलेल्या जळगावातील दाम्पत्यास संशयीतांनी शिविगाळ करीत मारहाण केली तसेच विवाहितेचेकपडे फाडून तिचा विनयभंग केला. ही घटना ईदगाजवळील मुस्लीम कॉलनीत सोमवार, 27 रोजी सकाळी 11 वाजता घडली. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघांविरोधात गुन्हा
जळगाव येथील 23 वर्षीय विवाहितेच्या तक्रारीनुसार, पतीसह ती मुस्लीम कॉलनीत संशयित आरोपींकडे उधारीचे पैसे मागण्यासाठी सोमवारी आली असता नासीर शेख यांची मुले तथा संशयित नदीम शेख नासीर, रफिक शेख नासीर व बिल्कीस शेख नासीर (सर्व रा.मुस्लीम कॉलनी, भुसावळ) यांनी अश्लील शिविगाळ करीत दाम्पत्यास मारहाण तसेच महिलेचे कपडे फाटून तिचा विनयभंग केला. तपास हवालदार गीता कश्यप करीत आहेत.



