लग्नाला जाताना दुचाकी सांभाळा ! : भुसावळातील मंगल कार्यालयाबाहेरून चोरट्यांनी दुचाकी लांबवली


Take care of the bike while going to the wedding! : Thieves stole a bike outside Mangal office in Bhusawal भुसावळ : शहरातील वांजोळा रोडवरील राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळून चोरट्यांनी 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकी चोरट्यांची टोळी सक्रिय
तक्रारदार तारीकेश पुरूषोत्तम जावरे (26, गणेशपूरी, पंचवटी मंदिराजवळ, भुसावळ) हे कार्यक्रमानिमित्त रविवार, 26 रोजी वांजोळा रोडवरील राधाकृष्ण मंगल कार्यालयात आले असता रात्री आठ ते दहा दरम्यान चोरट्यांनी संधी साधून त्यांची दुचाकी (एम.एच.19 सी.टी.4309) लांबवली. तपास नाईक तुषार पाटील करीत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !