बोहरा गावातील तरुणाला जुन्या वादातून मारहाण


A young man from Bohra village was beaten up due to an old dispute अमळनेर : तालुक्यातील बोहरा येथे जुन्या वादातून तरुणाला शिविगाळ करीत बेदम मारहाण करण्यात आली. याबाबत मारवाड पोलिसात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

जुन्या वादातून मारहाण
रामकृष्ण साहेबराव धनगर (23, रा. बोहरा ता.अमळनेर) हा तरुण आपल्या नातेवाईकांसह वास्तव्याला आहे. सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास रामकृष्ण धनगर हा घरी असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून सुजित दिलीप कोळी (बोहरा) व आकाश कोळी (जैनाबाद, जळगाव) यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आमच्या नादी लागू नको, नाहीतर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. दोघांविरोधात मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आाला. तपास पोलिस नाईक सुनील तेली करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !