कन्नड घाटात नवजात बालिकेला सोडून मातेचे पलायन


बाळ अनैतिक संबंधातून जन्मल्याचा संशय : त्या क्रुझर वाहनाचा पोलिसांकडून शोध

चाळीसगाव : चाळीसगाव-औरंगाबाद मार्गावरील कन्नड घाटावरील भाऊच्या ढाब्यासमोर नवजात स्त्री जातीच्या अर्भकाला सोडून मातेने पलायन केल्याची घटना 1 जानेवारी रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, अनैतिक संबंधातून हे बाळ जन्मले असल्याचा संशय आहे. पोलिसांकडून अज्ञात मातेसह क्रुझर वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

अर्भकाला टाकून मातेचे पलायन
कन्नड घाटावरील भाऊच्या ढाब्यासमोर 1 रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास कन्नडकडून येणारी क्रुझर गाडी रस्त्याच्या कडेला थांबल्यानंतर त्यातून काही महिला खाली उतरल्या तर धाबा मालकाने त्या गाडीकडे धाव घेत विचारणा केल्यानंतर चालकाने लघुशंकेचे कारण सांगून आम्ही निघतो आहे, असे सांगत धाबा मालकाला टाळण्याचा प्रयत्न केला व थोड्या वेळाने तेथून चाळीसगावच्या दिशेने निघून गेले परंतु काही वेळानंतर धाबा मालकाला रस्त्याच्या कडेला लहान बाळाचा रडण्याचा आवाज आल्याने त्यांनी धाव घेतली असता एका टोपल्याखाली लहान बाळाचा रडण्याचा आवाज आल्यानंतर ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस प्रवीण पाटील यांना माहिती कळवण्यात आली. त्यांनी धाव घेतल्यानंतर घटनास्थळी स्त्री जातीचे नवजात अर्भक आढळले. कन्नड ग्रामीण पोलिसांचे वाहने गस्तीदरम्यान आल्यानंतर त्या चिमुकलीला कन्नड रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेची माहिती फोनवरून चाळीसगाव महामार्गचे हवालदार योगेश बेलदार व हवालदार विरेंद्र राजपूत यांना दिली असता त्यांनीही चाळीसगाव हद्द सोडून असतानाही घटनास्थळी धाव घेत त्या क्रुझर वाहनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र वाहन आढळले नाही.


कॉपी करू नका.