धावत्या बसमध्ये महिला वाहकाचा तरुणाकडून विनयभंग


Female conductor molested by young man in running bus जळगाव : महिला वाहकाने तरुणाला तिकीट घे, असे सांगितल्याच्या कारणातून तरुणो अश्लील हातवारे करीत महिला वाहकाचा विनयभंग केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

माळपिंप्रीच्या तरुणाविरोधात गुन्हा
जळगावहून जामनेरकडे निघालेल्या बस क्रमांक (एम.एच.40 एन. 9094) मध्ये संशयित प्रवासी अभय विठ्ठल गाढेकर (माळपिंप्री, ता.जामनेर) हा तरुण प्रवास करीत होता. जळगाव शहरातील काशिनाथ चौकात बस आल्यानंतर महिला वाहकाने तरुणाला भाऊ तू टिकीट काढून घे, असे सांगताच महिला वाहकाकडे अश्लील हातवारे करीत तिच्या मनाला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य तरुणाने केले. या घटनेप्रकरणी महिला वाहकाने बस थांबून एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्याने अभय गाडेकर याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !