एरंडोलनजीक भीषण अपघात : डंपरच्या धडकेत पित्याचा मृत्यू, मुलगा जखमी
Fatal accident near Erandolan: Father killed, son injured in collision with dumper एरंडोल : पाचोरा तालुक्यात नातेवाईकाच्या गंधमुक्तीसाठी दुचाकीने जात असताना भरधाव वेगाने जाणार्या डंपरने दुचाकीस जबर धडक दिल्याने दुचाकीचालक श्रावण दगा पाटील (67) यांच्या अंगावरून डंपर गेल्याने ते जागीच ठार झाले तर मुलगा जखमी झाला. मुलाच्या डोळ्यादेखतच पित्याचा मृत्यू झाला.
सोमवारी घडला अपघात
दुचाकीवर मागे बसलेला मृताचा मुलगा अमोल पाटील हा रस्त्याच्या बाजूला फेकला गेला. ही दुर्घटना सोमवारी सकाळी एरंडोल-म्हसावद रस्त्यावर निखिल पेट्रोल पंपानजीक घडली. त्यानंतर डंपरचालक पोलिस – स्टेशनला हजर झाला. अमोल श्रावण पाटील (कल्याणे खुर्द, ता. धरणगाव) हा त्याचे वडील श्रावण पाटील यांच्यासोबत दुचाकीने (एम.एच.19 ए.झेड.1121) एरंडोलकडून म्हसावदकडे जात असताना वाटेत पेट्रोल पंपाजवळ म्हसावदकडून डंपर (एम.एच. 15 एफ.व्ही.7707) ने भरधाव वेगाने येऊन दुचाकीला धडक दिल्याने श्रावण पाटील यांच्या अंगावरून डंपरचे चाक गेल्याने ते जागीच ठार झाले. अमोल पाटील हा पेट्रोल पंपाच्या दिशेला फेकला गेला. पंपावरील कर्मचारी व आजूबाजूचे लोक घटनास्थळी धावत आले. त्यांनी ट्रॅक्टरने श्रावण पाटील यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे ते मृत झाल्याचे घोषित करण्यात आले.

