जळगावातील विवाहितेची सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या


A married woman in Jalgaon commits suicide due to her father-in-law’s torture जळगाव : शहरातील उस्मानियॉ पार्क भागातील सना तौसीफ मिस्तरी (21, रा.उस्मानियॉ पार्क, शिवाजी नगर, जळगाव) या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी जळगाव शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्यांनी करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

मंगळवारी मध्यरात्री घेतला गळफास
सना तौसफ मिस्तरी ही महिला आपल्या पती, सासू आणि सासरे यांच्यासह वास्तव्याला होती मात्र दोन महिन्यांपासून घरात कौटुंबिक वाद सुरू असल्याने विवाहिता या प्रकारांना कंटाळली होती. कौटुंबिक वादासंदर्भात विवाहितेने तिचे वडील मजीद शेख सांडू यांना सांगितले होते. मंगळवारी मध्यरात्री सर्वजण झोपलेले असतांना विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना बुधवार, 1 मार्च रोजी सकाळी सात वाजता उघडकीला आली. दरम्यान, पतीसह सासरच्या मंडळींच्या त्रासातून मुलीने आत्महत्या केली, असा आरोप विवाहितेचे वडील मजीद शेख सांडू व आई शबाना मजीद शेख सांडू यांनी पत्रकारांशी बोलतांना केला. सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी मुलीकडील नातेवाईकांनी केली आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात माहेरकडील नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेबाबत शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली, पुढील तपास हवालदार रवींद्र सोनार करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !