अंजाळे घाटात रस्ता लूट : पसार दोघा आरोपींसह पिस्टल जप्त


Road robbery in Anjale Ghat: Pasar two accused along with pistol seized यावल : भुसावळ-यावल रस्त्यावरील प्रकरणात पसार झालेल्या दोघा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले असून त्यांच्याकडून गावठी पिस्टल जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात एक संशयित अल्पवयीन असून तिसर्‍या आरोपीला बुधवारी न्यायाधीश एम.एस.बनचरे यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली तर अल्पवयीन संशयित आरोपीस पोलिसांनी बाल सुधारगृहात पाठवले आहे.

पसार संशयीतही जाळ्यात
यावल-भुसावळ रस्त्यावर सोमवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास भुसावळकडून येत असलेल्या अजय रमाकांत मोरे (27) या युवकाची दुचाकी अंजाळे घाटाजवळ चार अज्ञात चोरट्यांनी रोखत त्यास पिस्टलाचा धाक दाखवत मारहाण केली होती व त्याच्याकडील दुचाकीसह हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला होता. चार संशयीतांपैकी करण रमेश पवार (22), विक्की अंकुश साळवे (20, रा.आसोदा) या दोन संशयितांना सोमवारीच मध्यरात्री पोलिसांनी अटक केली तर मंगळवारी रात्री आसोदा, ता.जळगाव येथील प्रेम उर्फ सुरज पुना राठोड (21) यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला. प्रेम राठोड यास बुधवारी येथील न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली तर चौथा संशयित आरोपी अल्पवयीन असल्याने त्यास बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे, सहाय्यक फौजदार मुजफ्फर पठाण, भूषण चव्हाण करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !