भुसावळ तालुक्यात 13 नवीन ट्रान्सफार्मरला मंजूरी : आमदारांचा संजय सावकारे यांचा पाठपुरावा


Approval of 13 new transformers in Bhusawal taluka: MLAs follow Sanjay Savkare भुसावळ : भुसावळ तालुक्यातील नऊ गावांमध्ये 13 रोहित्र मंजूर करण्यात आले असून त्यासाठी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून 82 लाख 44 हजार रुपयांच्या निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील तसेच शेती वापराच्या विजेचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. यासाठी आमदार संजय सावकारे यांनी पाठपुरावा केला. आगामी महिन्याभरात हे नविन रोहित्र कार्यरत होतील, अशी आशा आहे.

शेतकर्‍यांना मोठा दिलासा
गावठाण व कृषी फिडरवरील वीज ग्राहकांसाठी शाश्वत स्वरुपाचा वीजपुरवठा व्हावा. यासाठी ट्रान्सफार्मरची गरज असते मात्र सध्या ट्रान्सफार्मरचा तुटवडा निर्माण झाला आहे.तालुक्यातील ग्रामिण भाग व शेतकर्‍यांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा. यासाठी आमदार सावकारे यांनी जिल्हा नियोजन मधून 82 लाख 44 हजार रुपयांचा निधीतून ट्रान्सफार्मर मंजूर केले आहे. यामध्ये भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे तीन, साकेगाव दोन, कुर्‍हे पानाचे दोन तर सुरवाडे बुद्रूक, सुरवाडे खुर्द, किन्ही, मोंढाळे, गोजोरा, पिंप्रीसेकम प्रत्येकी एक असे 13 रोहित्र मंजूर करण्यात आले आहेत. वारंवार ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड होतो. यामुळे शेतीसाठी शाश्वत विजपुरवठा मिळत नाही. तर काही ठिकाणी दाब वाढल्याने सध्यास्थितीमधील ट्रान्सफार्मरची क्षमता कमी झाली आहे. या नवीन ट्रान्सफार्मरमुळे शेतकर्‍यांना तसेच गावठाण भागांना शाश्वत वीजपुरवठा होणार आहे.

वरणगाव भागासाठीही प्रस्ताव
भुसावळ तालुक्यातील केवळ महावितरणच्या डिव्हीजनमध्ये येणार्‍या भागांना ट्रान्सफार्मर मिळाले आहेत.आता मुक्ताईनगर डिव्हीजनमध्ये येणार्‍या तालुक्यातील वरणगाव भागासाठीही नवीन ट्रान्सफार्मर मंजूर होतील. यासाठी देखील पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार संजय सावकारे यांनी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !