मेहरुण तलावात बुडाल्याने जळगावातील वृद्धाचा मृत्यू


Jalgaon old man died after drowning in Mehrun Lake जळगाव : जळगाव शहरातील जगवानी नगरातील 63 वर्षीय व्यक्तीचा मेहरूण तलावात बुडून मृत्यू झाला. हा प्रकार गुरूवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीला आला. बबन नामदेव पवार (63, जुनी वसाहत, जगवानी नगर, जळगाव) असे मृत वृध्दाचे नाव आहेे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

पाण्यात तरंगताना आढळला मृतदेह
बबन पवार हे आपल्या पालिीस कर्मचारी असलेल्या मुलगा व सुन यांच्यासोबत जगवानी नगरात वास्तव्याला होते. पवार हे बुधवारी सायंकाळी बाहेर पडल्यानंतर गुरूवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास मेहरूण तलाव येथे पोहण्यासाठी गेलेल्या काही वन्यजीव पथकातील काही सदस्यांना वृध्दाचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला. सुरूवातीला अनोळखी म्हणून पथकातील राजेश सोनवणे, रवींद्र भोई, अजीब काझी यांनी पोहणार्‍यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी समाधान टहाकळे आणि विकास सातदिवे यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. वयोवृद्धाच्या खिश्यातील कागदपत्राच्या आधारे त्यांची ओळखी पटली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस कर्मचारी समाधान टाहकळे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !