खेडी खुर्दच्या तरुणाचा छतावरून पडल्याने मृत्यू


A youth of Khedi Khurd died after falling from the roof जळगाव : मध्यरात्रीच्या छतावरून पडल्याने 25 वर्षीय तरुणाचा डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द येथे बुधवारी उघडकीस आली. अंकुश ज्ञानेश्वर चौधरी (25, खेडी खुर्द) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मध्यरात्री छतावरून पडला तरुण
खेडी खुर्द गावातील अंकुश हा तरुण शेती करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होता. मंगळवारी रात्री जेवण करून घराच्या गच्चीवर तो झोपला मात्र बुधवारी सकाळी त्याची आजी गोपाबाई चौधरी या नातवाला उठविण्यासाठी गेल्या असता अंकुश हा छतावरून खाली पडल्याने मयत स्थितीत दिसून आल्याने आजीने आरडा-ओरड केल्यानंतर जमाव जमला. जळगाव तालुका पोलिसांना कळवल्यानंतर पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. मयत अंकुशच्या पश्चात आई सुनिता, भाऊ भावेश, वडील ज्ञानेश्वर विठ्ठल चौधरी, आजी गोपाबाई असा परीवार आहे. या घटनेबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून नेमक्या मृत्यूचा कारणाचा शोध घेतला जात आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !