केसी पार्कजवळ अपघात : जळगावातील तरुणाचा मृत्यू
Accident near KC Park: Jalgaon youth dies जळगाव : कानळदा रोडवरील के.सी.पार्कजवळ दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुसर्या तरूणाही बुधवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. अमोल प्रकाश विसपुते (30, रा.कांचन नगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, अपघातातील इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
दुसर्या जखमीचाही मृत्यू
जळगाव शहरापासून कानळदा येथील के.सी.पार्कजवळ मंगळवारी रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत गणेश सोमा सपकाळे (32, आमोदा खुर्द) याचा जागीच मृत्यू झाला होता. यातील समाधान बाविस्कर (रा.आमोदा खुर्द) जितेंद्र एकनाथ चौधरी व अमोल प्रकाश विसपुते (रा.कांचन नगर, जळगाव) असे तिघेजण गंभीर जखमी झाले होते. यातील अमोल प्रकाश विसपुते याचा उपचारादरम्यान बुधवारी दुपारी 2.30 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर कांचन नगरातील मित्र परिवार व नातेवाईकांनी रूग्णालयात मोठी गर्दी केली. मयत अमोल हा रेमंड कंपनीत कंत्राटी पध्दतीने कामाला होता. गेल्या पाच दिवसांपासून रेमंड कंपनी बंद असल्याने अमोल घरीच असल्याने मित्रासोबत बाहेर गेला होता. मयत तरुणाच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि विवाहित बहिण असा परीवार आहे. या घटनेबाबत शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार रवींद्र सोनार करीत आहे.

