त्रिपुरा, मेघालय, नागालँड निवडणूक : रामदास आठवले गटाचे दोन आमदार नागालँडमध्ये विजयी


Tripura, Meghalaya, Nagaland Elections: Two MLAs of Ramdas Athawale group won in Nagaland मुंबई : ईशान्येकडील तीन राज्य त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस गुरुवारी सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. या तिन्ही राज्यांमध्ये विधानसभेच्या प्रत्येकी 60 जागा आहेत. या निवडणुकीसाठीचं मतदान त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारी तर नागालँड आणि मेघालयमध्ये 27 फेब्रुवारी रोजी झालं होतं. नागालँडमध्ये रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दोन आमदार निवडून आले आहेत. पहिल्यांदाच राज्याबाहेर आठवले गटाचे आमदार निवडून आले आहेत.

आठवडे यांच्यासाठी मोठी उपलब्धी
आठवले यांच्या आरपीआय पक्षाचे दोन उमेदवार नागालँडमध्ये विजयी झाले आहे. विधानसभा निवडणूकीत पहिल्यांदाच पक्षाच्या दोन महिला उमेदवारांनी महाराष्ट्राच्या बाहेर विजयाचा गुलाल उधळला आहे. महाराष्ट्राच्या बाहेर देखील रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. ही आठवले यांच्यासाठी ही मोठी गोष्ट असल्याचे बोलले जात आहे. या निकालांमुळे इतर राज्यातील निवडणूक निकालांवर देखील याचा परीणाम होण्याची शक्यता बोलली जात आहे.

भाजपाचे 12 उमेदवार आघाडीवर
दरम्यान, नागालँडलमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षचे उमेदवार 2 जागांवर निवडून आले आहेत. तर, एनडीपीपीचा उमेदवार 1 जागेवर निवडून आला आहे. भाजपाचे उमेदवार 2 जागेवर निवडून आले असून, 12 जागांवर आघाडीवर आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !