हनुमंतखेड्यातील वृद्ध शेतकर्याचा आगीत होरपळून मृत्यू
पाचोरा तालुक्यातील किन्ही शिवारातील दुर्दैवी घटना
An old farmer in Hanumantkheda died in the fire पाचोरा : उसाच्या मळ्यातील पाला-पाचोळा जाळण्यासाठी लावलेल्या आगीत होरपळल्याने हनुमंतखेडा येथील 82 वर्षाच्या वृद्ध हातमजुराचा मृत्यू ओढवला. बुधवारी दुपारी ही घटना किन्ही शेत शिवारात घडली. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गोकुळ रामदास पवार (82, हनुमंतखेडा, ता.सोयगाव) असे मयताचे नाव आहे.
शेतकर्याच्या मृत्यूने हळहळ
गोकुळ पवार हे बुधवार, मार्च रोजी किन्ही शिवारातील शेतात दुपारच्या सुमारास हात मजुरी करण्यासाठी गेले असता उसाच्या मळ्यात पाला पाचोळा जास्त झाल्याने गोकुळ पवार यांनी पाला पाचोळा एकत्रीत जाळला मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग विझविण्याच्या प्रयत्नात गोकुळ पवार हेच आगीच्या विळख्यात सापडले. घटनेची माहिती ग्रामस्थांना व घरच्या मंडळींना कळताच तात्काळ गोकुळ पवार यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी गोकुळ पवार यांना मृत घोषित केले. घटने प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्यानंतर ही नोंद शून्य क्रमांकाने सोयगाव पोलिसात वर्ग करण्यात आली. मयत गोकुळ पवार यांच्या पश्चात वृद्ध पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परीवार आहे.

