भुसावळात एकाची गळफास घेत आत्महत्या


One committed suicide by hanging himself in Bhusawal भुसावळ : शहरातील गोलाणी कॉम्लेक्स भागातील रहिवासी असलेल्या सुरेश दामोदर महाजन (49) यांनी गुरुवारी दुपारी तीन वाजता गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

बाजारपेठ पोलिसात नोंद
याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात महेश दामोदर महाजन यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. वरणगाव रोडवरील गोलाणी कॉम्लेक्स भागातील रहिवासी सुरेश दामोदर महाजन यांनी गुरूवारी दुपारी तीन वाजता गळफास घेतल्याचा प्रकार समोर आला असून या घटनेने या परीसरात खळबळ उडाली आहे. तपास हवालदार रवींद्र सपकाळे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !