भुसावळातील इंडीयन ओव्हरसीस बँकेतील एटीएमच्या बॅटर्या चोरट्यांनी लांबवल्या
ATM batteries of Indian Overseas Bank stolen in Bhusawal भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील नवशक्ती ऑर्केडमध्ये असलेल्या इंडीयन ओव्हरसीस बँकेच्या एटीएम सेंटरमधील तीन बॅटर्यांसह मॉनिटर चोरट्यांनी लांबवल्याची बाब तब्बत महिनाभराने उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुरुवारी रात्री बाजारपेठ पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनेत जामनेर रोड भागात खळबळ उडाली आहे.
महिनाभरानंतर चोरीचा प्रकार उघडकीस
इंडीयन ओव्हरसीस बँकेचे एटीएम नवशक्ती ऑर्केडमध्ये असून या एटीएमची कार्डरीडर (एटीएम कार्ड टाकण्याची जागा) ही जानेवारी महिन्यात खराब झाल्याने हे एटीएम बंद होते. बँक व्यवस्थापक रश्मी कुमार चंद्रभान सिंग या रूटीन तपासणीसाठी फेब्रुवारी महिन्यात एटीएममध्ये आल्या असता त्यांना एटीएमच्या स्टोअर रूममध्ये असलेल्या तीन बॅटर्या व मॉनिटर चोरीला गेल्याचे दिसले. यावेळी एटीएममध्ये कुठल्याही प्रकारची कॅश नव्हती. बॅटरी चोरीला गेल्याची घटना वरीष्ठांना सांगण्यात आल्यावर गुरूवारी बाजारपेठ पोलिसात रश्मी कुमार चंद्रभान सिंग यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 17 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यात म्हटले आहे.

अधिकार्यांची धाव
एटीएममधील चोरीची मिळताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह पोलिस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहाणी केली. यावेळी व्यवस्थापक रश्मिकुमार चंद्रभान सिंग यांनी पोलिस अधिकार्यांना माहिती दिली. दरम्यान, एटीएम जानेवारी महिन्यात नादुरूस्त झाल्याने ते चालत नसल्याने त्यावेळी एटीएममध्ये पाच लाखांची रोकड व्यवस्थापनाने काढून घेतली होती तर जानेवारीपासून एटीएम रीकामे असतानाच कार्ड टाकायची जागा चोरट्यांनी तोडल्याची धक्कादायक बाबही उघडकीस आली आहे. दरम्याल, पोलिसांनी तपासासाठी एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्या माध्यमातून चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
