उभ्या बैलगाडीवर ट्रॅक्टर धडकल्याने दोघा बैलांचा मृत्यू


Two bulls died when a tractor hit a standing bullock cart जळगाव : वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरने रस्त्यावर उभ्या असलेल्या बैलगाडीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघा बैलांचा मृत्यू ओढवला. हा अपघात जळगाव-कानळदा रोडवर शुक्रवारी सकाळी 10 वाजता घडला.

उभ्या बैलगाडीवर ट्रॅक्टर धडकले
जळगाव कानळदा रोडच्या बाजूला असलेल्या लक्ष्मी जिनिंगजवळ दगडू राजाराम धनगर (आव्हाणे) यांचे शेत असून शुक्रवारी सकाळी 10 वाजता दगडू धनगर हे मुलगा रावसाहेब धनगरसोबत शेतातील पिकांना खत देण्यासाठी बैलगाडीने निघाले होते. त्यांनी शेताच्या बाजूला असलेल्या रोडवर बैलगाडी उभी करून रासायनिक खते शेतात डोक्यावरून नेत असतानाच उभ्या असलेल्या बैलगाडीला जळगावकडून गिरणा नदीकडे भरधाव वेगो निघालेल्या रीकाम्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला बैलगाडीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात ट्रॅक्टरही उलटले तर सुदैवाने या ट्रॅक्टरजवळ शेतकरी दगडू धनगर व रावसाहेब धनगर नसल्याने मोठी जिवीतहानी टळली. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टर सोडून पसार झाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !