कसबा मतदार संघातील विजयाचा यावल शहरात जल्लोष


Jubilation in Yaval city for victory in Kasba constituency यावल : कसबा विधानसभा मतदार संघातील विजयाचा शहरातील बुरूज चौकात महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी एकत्र येत जल्लोष केला. उध्दव ठाकरे गटातील शिवसैनिकांनी फटाके फाडले व घोषणाबाजी केली. कसबा विधानसभा मतदारसंघात पार पडलेल्या पाटेनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवल्यानंतर यावल तालुका महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावरील यावल शहरातील बुरूज चौकात एकत्र येत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हा परीषदेचे माजी गटनेता प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, पंचायत समितीचे माजी गटनेता शेखर सोपान पाटील, शेतकी संघांचे चेअरमन अमोल भिरूड, काँग्रेस शहराध्यक्ष कदीर खान, वढोदे सरपंच संदीप सोनवणे, शिवसेनेचे शरद कोळी, शिवसेनेचे संतोष धोबी, माजी नगरसेवक मनोहर सोनवणे, राष्ट्रवादीचे फैजपूर शहराध्यक्ष अन्वर खाटीक, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष अ‍ॅड.देवकांत पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष फैजान शाह, राष्ट्रवादी काँग्रेसचे करीम चौधरी, शिवसेनेचे डॉ.विवेक अडकमोल, हाजी गफ्फार शाह, विवेक सोनार, अनिल जंजाळे, आदिवासी सेलचे अध्यक्ष बशीर तडवी, अमर कोळी, शेख नईम, विक्की सोनवणे,निसार खान, अश्फाक शाह, सरफराज शाह, सागर देवांग, मोहसिन खान, फारूक मुन्शीसह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !