मुक्ताईनगरात मोर्चादरम्यान शेतकर्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न : प्रसंगावधानाने टळला अनर्थ


A farmer attempted self-immolation during a march in Muktainagar: Disaster was averted by chance मुक्ताईनगर : कापसाला 15 हजार प्रती क्विंटल भाव मिळावा, केळी पीक विम्यातील जटील अटी रद्द कराव्या, केळी उत्पादक शेतकर्‍यांना अनुदान मिळावे यासह अन्य न्याय मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्या अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी सकाळी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, मोर्चानंतर अ‍ॅड.रोहिणी खडसे यांचे भाषण सुरू असतानाच अंतुर्ली येथील शिरतुरे नामक शेतकर्‍याने अंगावर पेट्रोल शिडकून आत्मदहनााचा प्रयत्न केला परंतु उपस्थितांच्या सतर्कतेने अनर्थ टळला.

बैलगाडीद्वारे आंदोलकांचा सहभाग
मुक्ताईनगरात गोदावरी मंगल कार्यालयापासून मोर्चाची सुरुवात झाली. तहसील कार्यालयाजवळ मोर्चाची आल्यानंतर त्याची सांगता करण्यात आली. मोर्चात केळीचे खोड, कांद्याच्या माळा, कापूस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे लावून बैलगाड्या सहभागी झाल्या. अजय तळेले यांनी सादर केलेला कुंभाकर्णाचा सजीव देखावा लक्ष वेधून घेत होता. यावेळी हजारो कार्यकर्ते व शेतकरी बांधवांनी सरकार विरोधी घोषणाबाजी केली. तहसीलदार यांना शेतकरी बांधवांच्या प्रश्नांचे निवेदन दिल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत करण्यात आले.

यांचा मोर्चात सहभाग
जनआक्रोश मोर्चात माजी आमदार अरुण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, क्षेत्र प्रमुख विजय सोनार, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, प्रशांतआबा पाटील, पवनराजे पाटील, विशाल खोले महाराज, माजी सभापती विलास धायडे, किशोर चौधरी, राजेंद्र माळी, दशरथ कांडेलकर, विकास पाटील, प्रदीप साळुंखे, निलेश पाटील, रामदास पाटील, दीपक पाटील, अमोल महाजन, किशोर पाटील, हेमराज पाटील, रवींद्र पाटील, सुधीर तराळ, रामभाऊ पाटील, माणिक पाटील, अनिल पाटील, अनिल वराडे, डॉ.बी.सी.महाजन, सोपान दुट्टे, रवींद्र दांडगे, सुनील काटे, वामन ताठे, सतीश पाटील, विजय चौधरी, प्रदीप बडगुजर, रणजीत गोयनका, प्रवीण पाटील, मस्तान कुरेशी, रउफ खान, लता सावकारे, रंजना कांडेलकर, वंदना पाटील, कविता गायकवाड व इतर पदाधिकारी सहभागी झाले होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !