जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 8 मार्च रोजी आयोजन
Organized District Level Democracy Day on March 8 जळगाव : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असलेतरी सोमवार 6 मार्च रोजी होळीची तर मंगळवार, 7 मार्च रोजी धुलीवंदनची शासकीय सुट्टी असल्यामुळे मार्च महिन्याचा लोकशाही दिन बुधवार, 8 मार्च रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालातील सभागृहात होणार आहे.
उपस्थितीचे आवाहन
जिल्ह्यातील नागरीकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असेल आणि सदर अर्जासंबंधी एका महिन्याच्या आंत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळाले नसेल, अशाच वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

