अ‍ॅड.प्रवीण चव्हाणांच्या जामिनावर सोमवारी सुनावणी


Add.Praveen Chavan’s bail hearing on Monday जळगाव  : जळगाव शहरातील निलेश भोईटे यांच्या घरावर अवैध छापा टाकल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिसांनी तत्कालीन सरकारी वकील अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांना अटक केली असून सध्या त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, अ‍ॅड.चव्हाण यांना न्यायालयाने पोलिस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावल्याने सरकार पक्षाने बुधवारी जळगाव सत्र न्यायालयात रीव्हीजन दाखल केल्यानंतर शुक्रवार दोन्ही बाजूकडून युक्तीवाद करण्यात आला. या प्रकरणी सोमवार, 6 रोजी पुन्हा जळगाव न्यायालयात रीव्हीजनवर सुनावणी होणार असून त्यानंतर अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांच्या जामिनावर निर्णय होणार आहे.

दोन्ही बाजूंनी झाला युक्तीवाद
गत रविवारी दुपारी चाळीसगावात अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांना अटक करण्यात आल्यानंतर सोमवारी न्या.आर.वाय.खंडारे यांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती तर अ‍ॅड.चव्हाण यांच्यातर्फे जामिनासाठी अर्ज करण्यात आला मात्र सरकार पक्षाने बुधवारी जळगावात न्यायालयाचे न्या.एस.बी.वावरे यांच्या न्यायासनापुढे बुधवारी क्रिमिनल रीव्हीजन क्रमांक 22/2023 दाखल केले होते. शुक्रवारी या रीव्हीजनवर दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद करण्यात आल्यानंतर आता या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांचा गुन्ह्यातील सहभाग पाहता सरकार पक्षाने पोलिस कोठडीच्या मागणीसाठी वरच्या न्यायालयात रीव्हीजन दाखल केले आहे. आता सोमवारच्या सुनावणीत काय निर्णय होतो? याकडे लक्ष लागले आहे. तपास पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !