अमळनेरच्या विवाहितेची छेडखानी : विरोध करणार्या पतीला मारहाण ; तिघांना अटक
Amalner Harassment of married woman: Beating husband who opposes; Three arrested अमळनेर : महाविद्यालयाबाहेर पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीला मारहाण करीत विवाहितेची छेडखानी करण्यात आल्याची संतापजनक घटना शहरात घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्या आली आहे.
चौघांविरोधात गुन्हा दाखल
शहरातील एका महाविद्यालयात शिक्षणासाठी आलेली विवाहिता मूळची नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे. शुक्रवार, 3 मार्च रोजी दुपारी वाजेच्या सुमारास अमळनेर शहरातील एका महाविद्यालयाच्या गेटच्या बाहेर चालत जात असतांना पाठीमागून चार टारगटांनी तिचा पाठलाग करीत बेबी कमेंट करीत स्त्री मनास लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले तसेच अन्य तिघांनी त्यास प्रोत्साहन दिले. याचवेळी पीडीतेचे पती आल्यानंतर त्यांना शिविगाळ करीत मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडीत विवाहितेच्या तक्रारीवरून संशयित अनिरुध्द उर्फ मोन्या अर्जुन चंडाले, चंद्रकात राजेंद्र पाटील, अविनाश अर्जुन चंडाले, अनिरुध्द उर्फ मोन्याचा भाऊ (पुर्ण नाव माहीत नाही, तिघं रा. अमळनेर) यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांना अटक करण्यात आली असून तपास निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रमोद पाटील करीत आहेत.

