चाळीसगाव तालुक्यात कापसाच्या गोदामाला आग : 15 लाखांहून अधिक नुकसान


Cotton godown fire in Chalisgaon taluka: Damage over 15 lakhs चाळीसगाव : तालुक्यातील पिलखोड येथील एका कापसाच्या गोडाऊनला अचानक आग लागल्याने सुमारे दोनशे क्विंटल कापूस जळून खाक झाल्याने अंदाजे दहा ते पंधरा लाखांचा नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.

अचानक लागली आग
मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथील व्यापारी दादा वाणी यांच्या मालकीचे हे कापूस हा गोदामात साठवण्यात आला होता मात्र दुपारी अचानक गोदामाला आग लागली. आग एवढी भीषण होती की, क्षणार्धात होतेच नव्हते झाले. या घटनेत गोडाऊनमधील तब्बल दोनशे क्विंटल कापूस जळून खाक झाले आहे. तब्बल 10 ते 15 लाख रुपयांचा नुकसान वाणी यांना झाले आहे. तत्पूर्वी सदर घटनेची माहिती मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड यांना मिळताच लागलीच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !