यावलच्या नॅशनल एज्युकेशन सोसायटीसाठी उद्या निवडणूक
Election tomorrow for National Education Society of Yaval यावल : यावल येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता रविवार, 5 रोजी मतदान होतआहे. मतदान केंद्र इंदिरा गांधी हायस्कूलमध्ये असून सकाळी 8 ते 5 मतदान व सायंकाळी 6 वाजेपासून मतमोजणीस सुरवात होईल. अतिशय प्रतिष्ठेची ही निवडणुक असून 14 जागेकरीता 27 उमेदवार रींगणात आहे तर मतदान व मतमोजणी करीता 30 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाची सर्वात मोठी दुसरी संस्था यावल शहरातील नॅशनल एज्युकेशन सोसायटी असून या संस्थेची सार्वत्रिक निवडणूक रविवारी होत आहे.
एकाच दिवशी निवडणूक व मतमोजणी
संस्थेच्या 14 जागे करीता 27 उमेदवार रींगणात आहे. रविवार, 5 मार्च रोजी सकाळी आठ ते सांयकाळी 5 या वेळेत या संस्थेच्या संचालक पदाकरीता मतदान होणार आहे. मतदान केंद्र हे चोपडा रस्त्यावर असलेल्या संस्थेच्या इंदिरा गांधी गर्ल्स हायस्कुलमध्ये असून दोन बुथ लावण्यात आले आहे. मतदान प्रक्रियेनंतर सायंकाळी 6 वाजेला याचं ठिकाणी मतमोजणीला सुरवात होईल. निवडणूक निर्णय अधिकारी शेख सलीम शेख अब्दुल नबी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक शेख रफीयोद्यीन अब्दुल नबी, शेख हारून शेख अमिर, मजीद खा हमीद खा, इफ्तेखार अहेमद शेख अखलाख, अय्युब खान फजलूल रहेमान, नासीर खान रहेमान खान, फारूकी जव्वाद अहेमद हे कामकाज पाहत आहे.

