माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या भुसावळात

भुसावळ : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवार, 3 रोजी पहाटे साडेतीन वाजता 12222 दुरांतो एक्स्प्रेसने भुसावळ रेल्वे स्थानकावर येत असून तेथून ते मोटारीने जळगाव व तेथून धुळे येथे जाणार आहेत. जिल्हा परीषद निवडणुकांच्या अनुषंगाने फडणवीस यांचा दौरा असल्याचे सूत्रांनी सांगितले. भुसावळ रेल्वे स्थानकावर भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवक व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पहाटे उपस्थिती द्यावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे व सरचिटणीस पवन बुंदेले व रमाशंकर दुबे यांनी केले आहे.


