प्राणघातक हल्ल्यातील संशयीत एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात
Suspect in deadly attack in MIDC police net जळगाव : एमआयडीसी पोलिसांनी प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणाच्या गुन्ह्यात 11 वर्षांपासून पसार आरोपीला अटक केली आहे. अधिक कारवाईसाठी या संशयीताला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. बाबू दासू अडसूळ (सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
11 वर्षानंतर संशयित गवसला
2012 मध्ये शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकावर जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणी शहर पोलिसात संशयित आरोपी बाबू अडसूळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून तब्बल 11 वर्षांपासून संशयित आरोपी बाबू हा पसार होता. संशयित आरोपी हा सुप्रिम कॉलनीत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलिसांना कळताच सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सतीश गर्जे, शुध्दोधन ढवळे, सिद्धेश्वर लटपटे, जितेंद्र राठोड, समाधान टाक यांनी संशयित आरोपी बाबू अडसूळ याला अटक केली. वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

