यावल महाविद्यालयामागे प्रौढाला मारहाण : सात संशयीतांविरोधात गुन्हा
Adult assaulted behind Yaval College: Case against seven suspects यावल : शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मागे असलेल्या बालाजी सिटीत 45 वर्षीय प्रौढाला सात जणांनी मारहाण केली, मी यावलचा दादा आहे, असे सांगून शिविगाळ करीत त्यांना जबर धक्का दिल्याने जमिनीवर कोसळल्याने या इसमाच्या डोक्याला जबर दुखापत झाली. या प्रकरणी अज्ञात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सात संशयीतांचा कसून शोध
यावल शहरातील फैजपूर रस्त्यावरील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मागे बालाजी सिटी ही वसाहत आहे. या ठिकाणी विजय गणपत बारी (45) हे रस्त्यावरून जात असताना काही कारण नसताना सात तरुण आले व त्यातील एकाने मी यावलचा दादा आहे, असे सांगून बारी यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली व नंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत त्यांना जोरात रस्त्यावर ढकलल्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. जखमी अवस्थेत विजय बारी यांनी थेट यावळ पोलिस स्टेशन गाठत तक्रार दिल्याने सात संशयीतांविरोधता गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पासपोळ करीत आहेत.

