प्रेरणा एक्स्प्रेसमधून महिला प्रवाशाची पर्स लांबवली : भुसावळातील घटना
Purse of female passenger stolen from Prerna Express : Bhusawal incident भुसावळ : 22138 प्रेरणा एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्या महिला प्रवाशाची पर्स चोरट्यांनी प्रवासी झोपल्याची संधी साधून लांबवली. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
रेल्वे प्रवासात चोर्या वाढल्या
तक्रारदार हर्षा दिनेश कोटेचा (56, नागपूर) या 22138 प्रेरणा एक्स्प्रेसच्या कोच एस- 2 च्या बर्थ क्रमांक 52 वरून अहमदाबाद-नागपूर असा प्रवास करीत असताना झोप लागल्याची संधी साधून चोरट्यांनी पर्स लांबवली. ही घटना शुक्रवार, 3 रोजी पहाटे चार वाजता भुसावळ स्थानक गेल्यानंतर घडली. पर्समध्ये चार हजारांची रोकड, तीन हजारांचा मोबाईल व सहाशे रुपयांची ज्वेलरी असा सात हजार 600 रुपयांचा ऐवज होता. नागपूर येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर तो भुसावळात वर्ग करण्यात आला.

