पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थींना मिळाले बांधकाम परवानगी पत्र

माजी नगरसेवक दीपक धांडे यांच्या पाठपुराव्याची मुख्याधिकार्यांकडून दखल
भुसावळ : शहरातील पंतप्रधान आवास योजनेच्या निकषाला पात्र असलेल्या लाभार्थींनी हक्काचे घर मिळावे यासाठी फॉर्म भरून दिल्यानंतर वर्षभर पालिकेत चपला झिजवल्यानंतरही लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळत नसल्याने माजी नगरसेवक दीपक धांडे यांच्याकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी 7 नोव्हेंबर मुख्याधिकारी करुणा डहाळे यांना निवेदन देत लाभार्थींसमवेत आंदोलनाचा इशारा दिला होता तर त्यानंतर 19 नोव्हेंबर रोजी मुख्याधिकार्यांच्या वाहनाला घेराव घालूपन त्यांना जाबही विचारण्यात आला होता तर त्यानंतर प्रशासनाला जाग न आल्याने 17 डिसेंबर रोजी पुन्हा स्मरणपत्र देत आंदोलनाचा इशाा दिल्यानंतर गुरुवार, 2 डिसेंबर रोजी लाभार्थींना पालिकेने बांधकामाचे परवानगी पत्र दिल्याने लाभार्थींनी समाधान व्यक्त केले.
लढा ठरला यशस्वी
माजी नगसेवक दीपक धांडे यांनी लाभार्थींना घरकुल मिळवून देण्यासाठी उभारलेल्या लढ्याला अखेर यश आले असून मुख्याधिकार्यांनी कागदपत्रे पूर्ण असलेल्या फाईलींवर स्वाक्षर केल्या तर आता लाभार्थींना बांधकामाचे परवानगी पत्र मिळाल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रसंगी दीपक धांडे यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ नगर पालिका मुख्याधिकारी यांचा हार-गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रसंगी लाभार्थी अनिल लोखंडे, विलास सोनोवणे, सुनंदा सुरवाडे, मीराबाई पाटील, यशोदा जाधव, अर्चना महाले, राजेंद्र सोनवणे, संतोष बंगले, कैलास चौधरी, वंदना वाणी, माया वाढवणी, अनिल रेड्डी, शांताराम भोई, मनोज खंडागडे, रीतेश वाघोडे, छाया वाघ आदींची उपस्थिती होती.


