वर्दळीच्या रस्त्यावरील जिल्हा परीषद शाळेतून टीव्ही संचाची चोरी : पाचोरा तालुक्यातील प्रकार


Theft of a TV set from a Zilla Parishad school on Wardli road : Case in Pachora taluka पाचोरा : पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेतील तीन शाळा खोल्यांमधून तीन एलईडी चोरट्यांनी लांबवले तर एक टी.व्ही.संच शाळेच्या आवारातच सोडण्यात आला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक गुणवंत पवार यांनी पाचोरा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी रात्री एक ते दीड वाजेच्या दरम्यान ही चोरी झाल्याचा अंदाज आहे.

चोरीमुळे उडाली खळबळ
अतिशय वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या गोराडखेडा येथील जिल्हा परीषदेची प्राथमिक शाळा असून शनिवारी सकाळी अकरा वाजता शिक्षक शाळेला कुलूप लावून घरी आले आल्यानंतर रविवारी व सोमवारी होळी सणा निमित्त शाळेला सुट्टी होती. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रविवारी पहाटे 1 ते 1.30 वाजता शाळेच्या मागील बाजूने प्रवेश केला व शाळेच्या कुलूप असलेल्या तीन खोल्यांचे कडी व दरवाजा दगडाच्या सहाय्याने तोडले. रुममधील सॅमसंग कंपनीचे मुलांना शिक्षण घेता येणारे एल. ई. डी. टी. व्ही. संच चोरण्यात आले मात्र एक संच शाळेच्या आवारातच सोडून 30 हजार रुपये किंमतीचे दोन टी. व्ही. संच घेऊन चोरटे पसार झाले. चोरट्यांनी शाळेच्या कार्यालयातील रेकार्ड, साहित्य अस्ताव्यस्त केल्याचे दिसून आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !