रावेर शहरात महाविकास आघाडीतर्फे पन्नास खोक्यांच्या होळीचे दहन
Burning of fifty boxes of Holi by Mahavikas Aghadi in Rawer City रावेर : पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा देत महाविकास आघाडीतर्फे शिंदे सरकारच्या निषेध करीत रावेर शहरात पन्नास खोक्यांच्या होळीचे दहन सोमवारी करण्यात आले. रावेर शहरात महाविकास आघाडीतर्फे पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा देत भाजपा व शिंदे गटाच्या सरकारचा निषेध करण्यात आला.
यांची आंदोलनप्रसंगी उपस्थिती
माजी आमदार अरुण पाटील यांनी महागाई, बेरोजगारी, शेतकर्यांच्या प्रश्नांवरुन राज्य सरकारवर सडकून टिका केली. नीळकंठ चौधरी, सोपान पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष किशोर पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे योगीराज पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख, माजी नगराध्यक्ष हरीष गनवाणी, रमेश महाजन, नीळळकंठ चौधरी, संतोष महाजन, सुरेश शिंदे, गयासुद्दीन काझी, एल.डी.निकम, अशोक खटवाणी, योगेश पाटील, सचिन पाटील, राहुल महाजन यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले.

