पत्नीशी अनैतिक संबंधाच्या वादातून तरुणाचा खून
A young man was killed due to a dispute over his immoral relationship with his wife सेनापती कापशी : आपल्या पत्नीचे एकाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तरुणाने पत्नीला सोडचिठ्ठी दिली मात्र संबंधित तरुणाशी वैर कायम राहिल्याने या तरुणाने गोळी झाडून संबंधित तरुणाची हत्या केली. भरत बळीराम चव्हाण (32, बाळेघोल, ता.कागल) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून खुनानंतर संशयित आरोपी विकास हेमंत मोहिते (रा.बाळेघोल, वय25) हा थेट मुरगूड पोलिस ठाण्यात स्वतः हुन हजर झाला. सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास सेनापती कापशी हद्दीत ही घटना घडली.
अनैतिक संबंधातून तरुणाची हाया
मयत भरत चव्हाण यास आपल्या पत्नीचे संशयित विकास मोहितेसोबत संबंध असल्याचा संशय असून त्यातून दाम्पत्यात खटके उडत असल्याने चार वर्षांपूर्वी भरत चव्हाण यांने पत्नीला घटस्फोट दिला. त्यानंतर भरत चव्हाण व विकास मोहिते यांच्यामध्ये पूर्व वैमनस्यातून वारंवार खुन्नस व वाद होत होते. गेल्या तीन ते चार वर्षांपासून हा प्रकार सुरू होता.

गोळी झाडत केली हत्या
सोमवारी सकाळी भरत चव्हाण हा आपला मित्र ओंकार जाधव याच्यासोबत सेनापती कापशी हद्दीतील चिंगरे पाणंद येथे विहिरीवर कामासाठी असताना विकास मोहिते याने मोटारसायकल आडवी मारुन गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. विकास मोहिते याने भरत याला मोटरसायकल वरुन खाली उतरवले व डाव्या कानशिलात गावठी कट्ट्यातून गोळी झाडताच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी विकास मोहिते हा थेट मुरगूड पोलिस ठाण्यात हजर झाला.
