यावलमधील नॅशनल एज्युकेशन सोसायटीत सत्ताधारी प्रगती पॅनलचे वर्चस्व

विरोधी गटाचा उडाला धुव्वा : 14 जागांवर सत्ताधार्‍यांचा एकतर्फी विजय


The ruling Pragati panel dominated the National Education Society in Yaval यावल : शहरातील नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी गटाच्या प्रगती पॅनलने विरोधी गटाच्या इनकलाबी पॅनलचा पुरता धुव्वा उडवत एकतर्फी विजय मिळवत संपूर्ण 14 जागा जिंकल्या. या निवडणुकीचा निकाल गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास जाहीर करण्यात आला. निकाल जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी गटाच्या वतीने मोठा जल्लोष करण्यात आला.

निवडणुकीत सत्ताधारी गटाचे वर्चस्व
यावल शहरातील नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत रविवारी मतदान होते. संस्थेच्या 14 जागांसाठी संस्थेच्या एकूण 291 मतदारांपैकी 273 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यात एकुण 93.81 टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री सात वाजेपासून मतमोजणीला सुरवात झाली. यात प्रचंड चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या मोहंमद ताहेर शेख चाँद यांच्या नेतृत्वात प्रगती पॅनलने अब्दुल करीम कच्छी यांच्या इनकलाबी पॅनलचा पुरता धुव्वा उडवत संपूर्ण 14 जागा जिंकल्या. रात्री उशीरा साडेअकरा वाजेला निकाल जाहिर करण्यात आला. या नंतर सत्ताधारी गटाने जल्लोष केला. निवडणुक निर्णय अधिकारी शेख सलीम शेख अब्दुल नबी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक शेख रफीयोद्यीन अब्दुल नबी, शेख हारून शेख अमिर, मजीद खा हमीद खा, इफ्तेखार अहेमद शेख अखलाख, अय्युब खान फजलूल रहेमान, नासिर खान रहेमान खान, फारूकी जव्वाद अहेमद यांनी काम पाहिले.

विजयी उमेदवार व मिळालेली मते अशी
मोहंमद ताहेर शेख चाँद (185), हाजी शब्बीर खान (180), इकबाल खान नसीर खान (178), अजीज खान हमीद खान (172), मो.याकूब शेख यासीन (171), अय्युब खान हमीद खान (170), गुलाम रसुल हाजी गुलाम दस्तगीर (169), मुस्तुफा खान सुभान खान (169), शेख इब्राहिम शेख चाँद (169), युसूफ खान ताहेर खान (164), अताउल्ला खान सैफउल्ला खान (159), जफरउल्ला खान अमानउल्ला खान (158), हुसेन खान भिकारी खान (158), जहिर बेग नुर बेग मिर्झा (147) या उमेदवारांनी विजय मिळवला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !