रावेरसह सावदा रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मिळणार लवकरच विविधांगी सुविधा

भुसावळ डीआरएम एस.एस.केडीया यांनी केली अधिकार्‍यांसह पाहणी


Passengers will soon get various facilities at Savada railway station including Raver भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रावेरसह सावदा रेल्वे स्थानकाची डीआरएम एस.एस.केडीया (Bhusawal DRM S.S.Kdia) यांनी नुकतीच पाहणी केली. रेल्वे प्रवाशांना विविधांगी सुविधा देण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न केले जात असून त्या दृष्टीने या स्थानकांवर प्रवाशाला दुचाकी व चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था, मार्ग, स्थानकावरील शेड, प्रतीक्षालय, आराम कक्ष, पादचारी पूल, लिफ्ट, गार्डन याची पाहणी कूठे व कश्या प्रकारे असेल याबाबत माहिती केडीया यांनी जाणून घेतली.

या अधिकार्‍यांची उपस्थिती
गति शक्ती युनिटचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक नवीन पाटील, वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ.शिवराज मानसपुरे, वरीष्ठ विभागीय विद्युत अभियंता पालटासिंग, वरीष्ठ विभागीय सिग्नल व दूरसंचार अभियंता विजय कांची, वरिष्ठ मंडल अभियंता (दक्षिण) निशांत कुमार व मंडल अभियंता शुक्ला आदी अधिकारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !