भुसावळात शिवजयंतीनिमित्त शुक्रवारी निघणार मिरवणूक

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयेाजन


A procession will take place on Friday in Bhusawal on the occasion of Shiv Jayanti भुसावळ : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणे शुक्रवार, 10, मार्च रोजी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे 1600 मिटरची स्वराज्य दौड स्पर्धा, मोटारसायकल रॅली, गड- किल्ले देखावे स्पर्धा, अन्नदान व सायंकाळी प्रमुख मार्गांवर मिरवणूक आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

विविध कार्यक्रमांचे आयोजन
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे यंदा शुक्रवारी तिथीप्रमाणे आयोजित शिवजयंती उत्सवानिमित्त गुरुवारी रात्री 12 वाजता मानवंदना व आतीशबाजी करण्यात येईल तर शुक्रवारी सकाळी सहा वाजता 1600 मीटरची स्वराज्य दौड स्पर्धा, सकाळी नऊ वाजता नाहाटा कॉलेज चौफुली स्टेशन व टिंबर मार्केट पुतळ्यापर्यंत रॅली काढली जाईल. तर गड किल्ले देखावे स्पर्धा घेतल्या जातील. सकाळी 11 वाजता रेल्वे स्थानक परीसरात गरीबांना अन्नदान करण्यात येणार असून सायंकाळी सहा वाजेपासून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणूकीमध्ये विविध देखावे सादर करण्यात येणार आहेत.

अध्यक्षपदी नीलेश चौधरी
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निलेश चौधरी, अमित खरारे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी राहुल सोनटक्के, अल्बर्ट तायडे, बब्बू धनगर, अनिकेत पाटील, सचिवपदी राहुल तायडे, रवी लेकूरवाळे, दर्शन लेकूरवाडे, सहसचिवपदी किरण मिस्त्री, रीतेश जैन, दलजीत चौधरी, हर्षल पाटील, कोषाध्यक्षपदी राहुल बोरसे, यशवंत बढे आदींची निवड झाली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !