रावेर तालुक्यातील अल्पवयीन तरुणीचा विनयभंग : तरुणाविरोधात गुन्हा


molestation of minor girl in Raver taluka : Crime against youth रावेर : तालुक्यातील रमजीपूर येथील अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना रविवारी मध्यरात्री अडीच वाजता घडली. या प्रकरणी संशयित प्रदीप उर्फ गोलू कालिदास महाजन (रमजीपूर) याच्याविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मध्यरात्री केला विनयभंग
संशयित प्रदीप महाजन हा गेल्या पंधरा दिवसांपासून पीडीतेकडे वाईट उद्देशाने पाहत होता शिवाय रविवारी अडीच वाजता संशयीताने पीडीतेच्या घरात शिरून तिच्याशी असभ्य वर्तन करीत तिचा विनयभंग करीत डोळ्यांनी चूप बसण्याचा इशारा केला. या प्रकरणी रावेर पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !