निंभोरा शिवारात मोबाईल टॉवरमधून बॅटरी व डिझेल चोरीचा डाव उधळला
A conspiracy to steal batteries and diesel from a mobile tower was foiled in Nimbhora Shivara भडगाव : निंभोरा शिवारातील मोबाईल टॉवरमधून बॅटरी आणि डिझेलची चोरी करताना अलार्म वाजल्यानंतर संबंधित कंपनीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर भडगाव पोलिसांनी धाव घेतल्याने चोरट्यांनी वाहनासह चोरी केलेले साहित्य सोडून पसार होण्याची वेळ आली.
चोरी करताच वाजला अलार्म
भडगाव-चाळीसगाव रोडवरील नभोरा शिवारातील शेतगट नं. 219/2/5 मध्ये जिओ कंपनीचे टॉवर असून या ठिकाणी अज्ञात व्यक्तींकडून चोरी होत असल्याची माहिती अलार्मद्वारे कंपनीला कळाली. कंपनीने पोलिसांना सूचित करताच भडगावचे निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी कॉन्स्टेबल प्रकाश गवळी, चालक संभाजी पाटील आदींना सूचित केल्यानंतर पथकाने धाव घेतली. यावेळी पोलिसांना पाहताच मेहंदी रंगाच्या स्कार्पियो गाडीतून चोरटे पसार होत असताना पोलिसांनी पाठलाग केला व मळगांब गावाजवळ वाहन सोडून चोरटे पसार झाले. गाडीत एक्साईड एक्सप्रेस कंपनीच्या चार बॅटर्या, प्रो ऑन कंपनीची लाल रंगाची बॅटरी, डिझेल ओढण्यासाठी बॅटरीवर चालणार्या मशीन नळीसह, एक सेल बॅटरी, 9 मोठ्या प्लॅस्टिक कॅन पैकी एक डिझेलने भरलेली, दोन काळ्या रंगाच्या सॅक, एक लोखंडी टॉमी, स्क्रु ड्रायव्हर, करवत पान (मोठे), करवत पान (लहान), पकड, वायर कटर आदी साहित्य आढळल्याने ते जप्त करण्यात आले. जिओ कंपनीचे सतीश दगा पवार (28, स्वामी समर्थ मंदिरासमोर, बाळद रोड, भडगाव) यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

