जळगावात दुधाची टपरी फोडून रोकड लांबविली
In Jalgaon, cash was extended by breaking the milk tank जळगाव : जळगाव शहरातील मेहरुण परीसरात असलेल्या महादेव मंदिराजवळील दूध डेअरीचे दुकान फोडून दुकानातील साडेसात हजाराची रोकड आणि मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. ही प्रकार मंगळवारी सकाळी 7.30 उघडकीला आली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
एमआयडीसी पोलिसात गुन्हा
सोनम रवींद्र पाटील (26, रा.रामेश्वर कॉलनी) यांच्या वडिलांचे मेहरुण परीसरातील महादेव मंदिराजवळ विकास दुधाची टपरी असून सोमवार, 6 मार्च रोजी दुपारी 1.30 वाजता दुधाचे दुकान बंद करून नातेवाईकांकडे लग्नाच्या कार्यासाठी निघून गेल्यानंतर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद दुधाची टपरी फोडून दुकानात ठेवलेली रोकड व चिल्लर असा एकूण सात हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार मंगळवारी सकाळी साडेसात वाजता समोर आला. यावेळी सोनम पाटील व रवींद्र पाटील यांनी दुकानात जाऊन पाहणी केली असता चोरट्यांनी टपरीचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत सामान फेकल्याचे दिसून आले. सोनम पाटील यांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल नितीन पाटील करीत आहे.

