मुक्ताईनगर पंचायत समिती सभापतीपदावर प्रल्हाद जंगलेंची वर्णी


मुक्ताईनगर : पंचायत समितीच्या सभापती पदावर प्रल्हाद हरी जंगले तर उपसभापती पदावर विद्या विनोद पाटील यांची बिनविरोध वर्णी लागली. प्रत्येकी एकच अर्ज आल्यानंतर पीठासीन अधिकारी तहसीलदार श्याम वाडकर यांनी बिनविरोध निवड जाहीर केली. प्रसंगी शुभांगी भोलाणे, सदस्य सुवर्णा साळुंखे, विकास पाटील, राजेंद्र सवळे, हे सदस्य उपस्थित होते. राष्ट्रवादी पक्षाच्या एकमेव सदस्य सुनीता चौधरी यांनी निवड प्रक्रियेकडे पाठ फिरवली. नवनियुक्त सभापती-उपसभापती यांचे पंचायत समिती सभागृहात माजी मंत्री एकनाथराव खडसे, बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर यांनी सत्कार केला. प्रसंगी माजी सभापती राजेंद्र माळी, जि.प.च्या माजी सदस्या विद्या जंगले, सरचिटणीस संदीप देशमुख, डॉ.बी.सी.महाजन, विनोद पाटील, सुनील काटे, राजेंद्र टावरी आदींची उपस्थिती होती.


कॉपी करू नका.