जळगावात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
The body of an unknown person was found in Jalgaon जळगाव : जळगाव शहरातील मानसिंग मार्केट परिसरातील हॉटेल विसावा च्या मागील बाजूस मंगळवारी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन
जळगाव शहरातील मानसिंग मार्केटजवळ असलेल्या हॉटेल विसावाच्या मागील बाजूस एक व्यक्ती बेशुध्दावस्थेत पडला असल्याची माहिती मंगळवारी शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस हेड कॉन्स्टेबल रवींद्र सोनार यांनी संबंधितास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता ैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ.झिशान खान यांच्या खबरीवरुन शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताचे वय अंदाजे 45 वर्ष असून मयताची ओळख पटविण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. तपास पोलिस हवालदार रवींद्र सोनार करीत आहेत.

