वड्री धरण व आसारबारीत भोंगर्या बाजार उत्साहात
रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात अनेकांचा पक्षात प्रवेश
यावल : यावल तालुक्यातील वड्री गावापासून तीन किलोमीटर अंतरावरील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी आसारबारी धरण येथे 30 ते 35 वर्षापासून वास्तव्यास असलेले आदिवासी बांधवांनी रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली अनेकांनी रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात प्रवेश केला. प्रसंगी भोंगर्या बाजाराचेही आयोजन करण्यात आले.
भोंगर्या बाजाराचे उद्घाटन
या ठिकाणी शाखेचे फलकाचे अनावरण आरपीआय जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी वडरी गावातील सरपंच अजय भालेराव, ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ व अन्य कार्यकर्त्यांसोबत भोंगर्या बाजारासंदर्भात चर्चा करून वडरी येथील सरपंच अजय भालेराव व यावल तालुकाध्यक्ष विष्णू भाऊ पारधे यांनी योग्य ते कागदपत्रे जमा करून योग्य ती परवानगी घेत भोंगर्या बाजाराचे आयोजन केले. सर्व आदिवासी बांधव रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष विष्णू पारदे व वडरी येथील सरपंच अजय भालेराव यांचे स्वागत करण्यात आले. या भोंगर्या बाजाराचे उद्घाटन आरपीआय जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, वडरी येथील सरपंच तालुकाध्यक्ष विष्णू पारदे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांना आदिवासी बांधवांचा पेरावा व तीर कमान देऊन स्वागत करण्यात आले.

भोंगर्या बाजारात आदिवासी बांधवांमध्ये उत्साह
भोंगर्या बाजाराने आदिवासींमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. मध्य प्रदेशासह महाराष्ट्रातील पाड्या-पाड्यांमधील आदिवासींची या बाजारांकडे धाव घेत भोंगर्या बाजाराचा आनंद घेतला. वड्री धरण आसारबारी येथे प्रथमच आदिवासी पावरा समाजाने भोंगर्या बाजाराचे आयोजन केले. पारंपरीक पद्धतीत वेशभूषा करीत नाच गाण्यांनी हा बाजार उत्साहात पार पडला. या भोंगर्या बाजाराला आरपीआय जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, सेवानिवृत्त सैनिक जिल्हाध्यक्ष सुनील तायडे, यावल तालुकाध्यक्ष विष्णू पारदे बाबूलाल पटेल, युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत वानखेडे, उपाध्यक्ष विक्रम प्रधान. जिल्हा सचिव सुपडू संदानशीव, संघटक डॉली वानखेडे, राजू इंगळे राजू वानखेडे, शिवाजी गजरे, किरण तायडे, प्रवीण सावळे, सातपुडा पायथ्याशी असलेले संपूर्ण आरपीआयचे आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते.
