भुसावळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची नूतन कार्यकारणीचे गठण

अध्यक्षपदी समाधान निकम तर उपाध्यक्षपदी कुणाल अहिरे


भुसावळ : विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त भुसावळ शहर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष समाधान निकम व उपाध्यक्ष कुणाल अहिरे यांच्या नेतृत्वात जयंती उत्सव समितीची बैठक झाली. त्यात उर्वरीत कार्यकारणी गठीत करण्यात आली.

नूतन कार्यकारीणी अशी
मुख्य मार्गदर्शक समिती- रमेश मकासरे, राजू सूर्यवंशी, जगन सोनवणे, उल्हासभ पगारे, रवींद्र निकम, रवी सपकाळे, विलास सपकाळे, विनोद सोनवणे, सल्लागार समिती- राहुल (बाळा) सोनवणे, संगीत खरे, श्रीकांत वानखेडे, नरेंद्र (बाळा) मोरे, सुदाम सोनवणे, गणेश सपकाळे, समिती मुख्य प्रवक्ता- बाळा पवार, सचिव- धनराज सपकाळे, सहसचिव- विक्रम प्रधान
कोषाध्यक्ष- दीपक नाटेकर, सहकोषाध्यक्ष-शुभम सोयंके, योगेश बागुल, समिती कार्याध्यक्ष- विकास इंगळे, दीपक सोनवणे (टापर्‍या), सिद्धांत मस्के, समिती सदस्य- अश्विन नरवाडे, अजय तायडे, संदीप तायडे, नरसीम तायडे, सुनील उमरीया, लखन चंडाले.

बाळा सोनवणे यांचा गौरव
जयंती समितीचे माजी अध्यक्ष बाळा सोनवणे यांच्या वतीने प्रथमच भुसावळ शहरात मध्यवर्ती ठिकाणी जयंती समितीला हक्काचे कार्यालय उपलब्ध करून देण्यात आल्याने समितीने त्यांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला. भीमसैनिकांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मुख्य मार्गदर्शक समितीच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहाने साजरी करून संपूर्ण भुसावळ शहर निळेमय करण्याचा संकल्प करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !