भुसावळात गुढीपाडव्यानिमित्त 22 रोजी मरीमातेचा यात्रोत्सव
अप्रिय घटना टाळण्यासाठी बारागाड्यांवर केवळ स्वयंसेवकांना बसण्याची परवानगी
भुसावळ : शहरात मरीमातेच्या यात्रोत्सवानिमित्त गुढीपाडव्याला बारागाड्या ओढण्याची परंपरा आहे मात्र गतवर्षी घडलेल्या वाईट घटनेचा अनुभव पाहता यंदा बारागाड्यांमध्ये केवळ सतारे भागातील विविध मंडळाचे पदाधिकारी असलेल्या स्वयंसेवकांनाच बसण्याची संधी मिळणार आहे. यात्रोत्सवावर ड्रोनची नजर राहणार असून त्यासोबतच एक बेडचा दवाखाना व दोन रुग्णवाहिका तैत्रात असतील, असे नियोजन यात्रोत्सवानिमित्त आयोजित बैठठकीत करण्यात आले.
यांची बैठकीला उपस्थिती
रविवारी रात्री मरीमाता मंदिराजवळ भाविक, समिती तसेच सतारे ग्रामस्थांची बैठक झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, दीपक धांडे, युवराज पाटील, सतीश सपकाळे, चंद्रशेखर इंगळे, अॅड.नरेंद्र लोखंडे, विशाल ढोके, भरत कोळी, सोनू मांडे, गुणवंत बोरोले, भीमराज कोळी, सतारे गावातील भाविक उपस्थित होते. या बैठकीत यंदाच्या यात्रोत्सवात पंचमुखी हनुमान मंदिर ते शर्मा चक्की पर्यंतच्या मार्गावर बॅरिकेटींग करणे, हेमराज भोळे यांच्या घरापासून ते पाणपोईपर्यंतच्या भागात मोठ्या दुकानांचे स्थलांतरण करणे, आपत्कालीन स्थितीत उपचारासाठी दोन अॅम्बुलन्स तैनात ठेवणे, सरदार पटेल पुतळ्याच्या आवारात एक बेडचा दवाखाना करणे, स्वयंसेवकांसाठी 300 टी शर्ट छपाई करणे आदींबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान, यंदाच्या यात्रोत्सवात भगत देवेंद्र सपकाळे (देवू) हे बारागाड्या ओढणार असून बगले म्हणून मयुर भोळे व दुर्गेश पाटील असणार आहेत.

