वरणगावला शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक

शिवसेनेतर्फे आयोजन ; शुक्रवारी सायंकाळी मिरवणूक निघणार


भुसावळ : छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार 10 मार्च रोजी जयंती वरणगावात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे. या जयंतीनिमीत्त शिवसेना (उबाठा) गटातर्फे वरणगाव शहरात सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक आणि सायंकाळी पाच वाजता मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपतींच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक
अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार शुक्रवार, 10 मार्च रोी जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे. यामध्ये सकाळी 10 वाजता नगरपरीषदेजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक जिल्हाप्रमुख समाधान महाजन, ज्येष्ठ शिवसैनिक विलास मुळे यांच्यासह शिवसैनिकांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता रेल्वे स्टेशन रोड, रेस्ट हाऊस जवळून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मिरवणुकीला प्रारंभ होईल. या दिवशी सकाळी दुग्धअभिषेकला आणि सायंकाळी मिरवणुकीला शहरातील सर्व राजकीय, सामाजिक शिवप्रेमी नागरीकांनी युवकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शहरप्रमुख संतोष माळी, उपशहरप्रमुख सुनील भोई, अशोक शर्मा, राम शेटे, सुखदेव धनगर, बाळु माळी, उमाकांत झांभरे, विकी मोरे, संजू कोळी यांच्यासह शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी केले आहे.

मिरवुकीचा असा राहणार मार्ग
शिवजयंती मिरवणुकीला रेस्ट हाऊसजवळून सायंकाळी पाच वाजता प्रारंभ होईल. बसस्थानकमार्गे डेली भाजी मार्केट, जुनी पोस्ट गल्ली, मोठी होळी, चौधरी वाडा, बढे वाडा, मोठा माळी वाडा, गांधी चौक पुढे नगरपरीषद जवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते पूजन आणि छत्रपतींची आरती करून मिरणुकीची सांगता होणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !