चाळीसगाव शहरातील व्ही.एच.पटेल प्राथमिक विद्यालयात महिला दिन उत्साहात
चाळीसगाव : चाळीसगाव शहरातील व्ही.एच.पटेल प्राथमिक विद्यालयात बुधवारी महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. चाळीसगाव वनविभागाच्या वनपरीक्षेत्र अधिकारी शील नगराळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. व्यासपीठावर मुख्याध्यापक नाना मोरे, ज्येष्ठ शिक्षिका मंजुषा नानकर, सुजाता मोरे, त्रिशला निकम, बालवाडी विभाग प्रमुख रंजना चौधरी आदि उपस्थित होते. नगराळे यांच्या हस्ते सर्व महिला शिक्षकांचा ’राजमाता जिजाऊ’ हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
जिद्द, चिकाटी व परीश्रमाने निश्चित यश
परीश्रम आणि चिकाटी असेल तर प्रत्येक क्षेत्रात महिला यशस्वी होऊ शकते. मला मुलगी झाल्यानंतर स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण झाले. एकाच वर्षात अशा स्पर्धा परिक्षांमध्ये मी यशस्वी झाले, असे शीतल नगराळे म्हणाल्या. मंजुषा नानकर, नाना मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. मनिषा सैंदाणे यांनी परीचय दिला तर आभार शर्वरी देशमुख यांनी मानले. यशस्वीतेसाठी शिक्षक वृंदासह दत्तात्रय गवळी यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन जिजाबराव वाघ तर यशस्वितेसाठी शिक्षक – शिक्षकेत्तर वृंदासह दत्तात्रय गवळी यांनी सहकार्य केले.

