हेल्प इज हॅप्पीनेस विषयावर खुल्या स्पर्धा


जळगाव : “लाईफ इज ब्युटीफुल फाऊंडेशन” आयोजित ‘हेल्प फेअर-५’ या प्रकल्पाअंतर्गत खुल्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या खुल्या स्पर्धेत चित्रकला, फोटोग्राफी व कविता लेखन या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. तिन्ही स्पर्धांचा विषय एकाच ठेवला आहे जो हेल्प फेअर ची मेन थीम आहे “हेल्प इज हॅप्पीनेस”. काहीतरी चांगलं करून, शेअर करून, कोणाची मदत करून व्यक्तीला खरा आनंद मिळत असतो. आणि याच विषयावर फोटोग्राफ किंवा कल्पक ड्रॉईंग किंवा शॉर्ट कविता तयार करून स्पर्धकाला 91300 86772 या क्रमांकावर व्हाट्सअप करायचे आहे किंवा मल्हार कम्युनिकेशन्स यांच्या कार्यालयात जमा करायचे आहे. स्पर्धेची सविस्तर माहिती, नियम हेल्प फेअर च्या फेसबुक व इंस्टाग्राम च्या पेजवर उपलब्ध आहेत. या स्पर्धेतून शॉर्ट लिस्ट झालेल्या एंट्रीजला १ ते ३ एप्रिल दरम्यान होणाऱ्या हेल्प फेअर कार्यक्रमात प्रदर्शित केले जाईल. व विजेत्याला ट्रॉफी तसेच रोख रक्कम हेल्प फेअर ५ च्या समारोपीय कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते देण्यात येईल. जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे , असे आवाहन हेल्प फेअर टीमतर्फे करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !