खंडेराव नगरात शस्त्रांच्या धाकावर मजुराला ठार मारण्याची धमकी
Threat to kill laborer at gunpoint in Khanderao Nagar जळगाव : शहरातील खंडेराव नगरात जुन्या वादातून मजूराला चाकू, कोयता आदी शस्त्रांचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
चौघांविरोधात गुन्हा दाखल
गिरीश किशोर घुगे (20, खंडेराव नगर, जळगाव) या तरुाला मंगळवारी 7 मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून गल्लीतील लतीप शकील पिंजारी आणि त्यांच्यासोबत असलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी हाता चाकू, कोयता घेवून गिरीशच्या घरी येत शस्त्रांचा ाक दाखवून तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत परीसरात दहशतदेखील पसरविली. हा प्रकार घडल्यानंतर दुपारी चार वाजता गिरीश घुगे याने रामानंद नगर पोलिसात तक्रार दिल्याने लतीफ शकील पिंजारी याच्यासह सोबत असलेले अनोळखी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

