महिलेच्या डोक्यात टाकला रॉड : जळगावातील घटना


Rod thrown into woman’s head: Incident in Jalgaon जळगाव : शहरातील वाघ नगरातील महिलेला काही कारण नसतांना एकाने डोक्यात लोखंडी रॉड मारल्याची घटना रामानंदनगर घाटाजवळ घडली. याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

कारण नसताना केली मारहाण
जळगाव शहरातील वाघ नगर परीसरातील पूनम प्रभाकर जाधव (38) या महिला परीवारासह वास्तव्याला असून सोमवारी सकाळी 11 वाजता त्या रामानंद नगर परीसरातील घाटाजवळून पायी जात असतांना प्रज्ञा अ‍ॅटो गॅरेज येथे संशयित सिध्दार्थ भाऊसिंग सैंदाणे (रा.श्रीधर नगर, जळगाव) याने काहीही कारण नसतांना महिलेच्या कानशिलात लगावत शिविगाळ करून हातातील लोखंडी रॉड डोक्यात टाकला. यात महिला गंभीर जखमी झाली. त्यांना तातडीने जिल्हा शाासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी महिलेने रामानंदनगर पोलिसात तक्रार दिल्याने संशयित आरोपी सिध्दार्थ भाऊसिंग जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ढील तपास पोलिस कॉन्स्टेबल उषा सोनवणे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !