अमळनेरात धाडसी घरफोडी :  दिड लाखांचा ऐवज लंपास


Daring house burglary in Amalner : One and a half lakhs instead of loot अमळनेर : शहरातील भगवा चौकातील बंद घरातून चोरट्यांनी रोकडसह सोन्याचे दागिणे मिळून सुमारे दिड लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांसाठी पर्वणी
दीपक जगन्नाथ सूर्यवंशी (40, पाटील कॉलनी, भगवा चौक, जळगाव) हे सलून व्यावसायीक असून मंगळवार, 7 मार्च रोजी दुपारी 12 वाजता ते घर बंद करून बाहेरगावी गेल्याची संधी चोरट्यांनी साधली. चोरट्यांनी घराचे कूलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्रे असा एकूण 1 लाख 52 हजार 450 रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. दुपारी तीन वाजता ते घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, पोलिसात दागिण्यांचे मूल्य जुन्या दराने लावण्यात आले असलेतरी आजच्या मूल्यानुसार चोरीचा आकडा लाखोंचा घरात आहे. दीपक सूर्यवंशी यांनी अमळनेर पोलिसात तक्रार दिल्यानंतर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !